Shraddha Thik
राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. राममंदिरातील श्री रामलल्यांच्या प्राणप्रतिष्ठा विधींना मंगळवारपासून सुरुवात होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा अधिकारार्थ शरयू तीरावर मुख्य यजमानांचे दशविध स्नान, गोदान केले जाईल.
जलयात्रा, कलश पबजन, ब्राम्हण बटू कुमारी सुवासी पूजन, कलशयात्रा भगवान श्री रामल्लाच्या मूर्तीची ग्रामदक्षिणा केली जाईल.
प्रधान संकल्प केला जाईल. सर्व देवतांचे पूजन, चारही वेदांच्या मंत्राचे पूजन केले जाईल.
सर्व देवतांचे प्रातः पूजन, वेद पारायणांची व्यवस्था, देवप्रबोधन म्हणजे अधिवासातून देवाला जागृत करणार आहेत.
नित्यप्रातः पूजन, शर्कराधिवास, फलधिपास, 81 कलशांद्वारे प्रासादस्नान
नित्यपूजन, मधाधिवास, विविध औषधींद्वारे 108 कलशांमी मूर्तीचे स्थान
देवप्रबोधन करुन मूळगर्भगृहामध्ये श्री रामल्ला यांना सिंहासनावर बसवले जाईल. दुपारी 12 वाजून 29 मिनिटांचा मूहूर्त आहे.