ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भावा बहिनीचं नातं सर्वात खोडकर पण प्रेमळ मानलं जातं. त्यांच्यातील बॉंडिंग घरामधील वातावरण सकारात्मक करते.
यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. राखी बांधतांना शास्रानुसार काही विशेष नियम पाळणं महत्त्वाचे असते.
राखी भावाला कधीच रिकाम्या हाताने बांधू नये. यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रगती थांबते.
राखी बांधताना भावाच्या हातात तांदुळ ठेवा. वास्तूशास्त्रानुसार, तांदुळ सूख समृद्धीचं प्रतिक मानले जाते.
राखी बांधताना भावाच्या हातात वेलची ठेवण शुभ मानलं जातं. वास्तूशास्त्रानुसार, वेलची आयुष्यात खुप मोठा बदल घडवू शकते.
तुमच्या कामामधील प्रगती, अडचणी, पैश्यांची चणचण यासारख्या समस्यांवर वेलची फायदेशीर मानला जाते.
भावाची ओवाळणी करताना त्याच्या मुठीत तांदूळ आणि एक वेलची ठेवा. त्यामुळे भावाच्या आयुष्यात सुख नांदेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: चाणक्य नीतीनुसार व्यक्तीला 'या' सवयी बनवतात श्रीमंत