Monsoon Riding Tips: पावसाळ्यात बाईक चालवताना टाळा 'या' चुका, वाचा धोका टाळण्याचे उपाय

Dhanshri Shintre

पावसातील रस्ते

पावसात रस्ते ओले व निसरडे होतात, खराब टायरमुळे ग्रिप कमी होते आणि अपघाताचा धोका वाढतो.

ब्रेक लागताना

ओल्या रस्त्यावर बाईक वेगाने चालवल्यास ब्रेक लागताना वेळ लागतो आणि तोल जाण्याची शक्यता वाढते, त्यामुळे धोका संभवतो.

हळूहळू ब्रेक लावा

अचानक ब्रेक लावल्याने बाईक घसरू शकते, त्यामुळे पावसाळीत नेहमी सावधगिरीने, हळूहळू ब्रेक लावा.

बाईकचा तोल

पाण्याने भरलेल्या रस्त्यावर खड्डे लपलेले असतात, ज्यामुळे बाईकचा तोल बिघडू शकतो आणि इंजिनमध्ये पाणी जाऊ शकते.

धोका

रेनकोट, शू कव्हर आणि हेल्मेट शील्ड न वापरल्यास ओले होण्यासोबतच दृष्टीही अस्पष्ट होते, ज्यामुळे धोकाही वाढतो.

हेल्मेटची काच

पावसाळ्यात धुक्यामुळे आणि पाण्यामुळे हेल्मेटची काच धुंद होते, ज्यामुळे समोर पाहणे अवघड होते.

बाईक नीट तपासा

पावसाळ्यापूर्वी ब्रेक, चेन, लाइट्स आणि इलेक्ट्रिकल्स नीट तपासा, नाहीतर रस्त्यावर बाईक अचानक बंद होऊ शकते.

NEXT: पावसाळी चपलांमध्ये फसणे टाळा; जाणून घ्या कोणत्या चपलांमुळे पायांना होऊ शकते नुकसान

येथे क्लिक करा