Surabhi Jayashree Jagdish
सोमवती अमावस्या ३० डिसेंबरला आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला सोमवती अमावस्या साजरी केली जाते.
सोमवती अमावस्या दर्श किंवा पौष अमावस्या असंही म्हटलं जातं. अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
सोमवती अमावस्या अतिशय विशेष मानली जाते कारण या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग आणि शिववास योग यांचा संयोग होणार आहे.
चला तर मग जाणून घेऊया सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्या चुकांची काळजी घ्यावी.
अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय होतात असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी कोणत्याही निर्जन जागेत जाऊ नये.
या दिवशी तुमच्या घरात आणि आजूबाजूला शांतता राखण्याचा प्रयत्न करा. या दिवशी भांडणे किंवा त्रासांपासून दूर राहा.
सोमवती अमावस्येच्या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये.