Surabhi Jayashree Jagdish
स्वयंपाक करताना आपण हमखास जिऱ्याचा वापर करतो.
मात्र तुम्हाला माहितीये का, अशा काही भाज्या आहेत, ज्यामध्ये जिऱ्याचा वापर अजिबात करू नये.
जिऱ्याचा वापर करून जेवणाची चव वाढता येते. पण काही भाज्यांमध्ये जिरं घातल्यास त्यांची चव खराब देखील होऊ शकते.
वांग्याची सुकी भाजी किंवा रस्सा भाजी दोन्ही प्रकारे करताना त्यामध्ये जिरं घालू नये. असं केल्याने त्याची चव बिघडू शकते.
भोपळ्याच्या भाजीतही जिरं वापरू नये. भोपळ्याची भाजी चविष्ठ बनवायची असेल तर त्यामध्ये मेथीचा वापर करावा.
मॅकरोनी पास्त बनवताना काहीजण त्यामध्ये जिरं टाकतात. मात्र यामुळे तुमच्या डिशची चव खराब होऊ शकते.