Shruti Vilas Kadam
टीव्ही असो किंवा चित्रपट... बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही पदार्पण केल्यानंतर दुसऱ्या चित्रपटामुळे ट्रोल झाली होती.
या अभिनेत्रीचा जन्म २००१ मध्ये झाला होता. तिने वयाच्या ८ व्या वर्षी तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती पहिल्यांदा "डान्स इंडिया डान्स" या डान्स शोमध्ये दिसली, त्यानंतर तिने "डान्स के सुपरस्टार्स" या शोमध्ये भाग घेतला. तिने "मेरी माँ" या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
ही अभिनेत्री म्हणजे अवनीत कौर जी आता २३ वर्षांची आहे. अलादीनमध्ये जास्मिनची भूमिका साकारत अवनीत कौरला पुन्हा चर्चेत आली.
अवनीत कौरने २०१४ मध्ये आलेल्या YRF चित्रपट "मर्दानी" मध्ये काम केले होते.
त्यानंतर तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत "टिकू वेड्स शेरू" मध्येही मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या किसींग सिनमुळे बराच वाद निर्माण झाला होता. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला होता.
चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ती २१ वर्षांची होती. तिच्यापेक्षा २८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबतच्या तिच्या किसींग सिनला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
अवनीत कौरची संपत्ती ४१ कोटी (अंदाजे $४.१ अब्ज) पेक्षा जास्त झाली आहे.