Manasvi Choudhary
अश्विन महिन्यात कालाष्टमी म्हणून आठवी पूजा साजरी केली जाते.
दिवाळीच्या आठ दिवसांआधी कालाष्टमी साजरी केली जाते.
यंदा ५ नोव्हेंबर २०२३ ला आठवी पूजा साजरी करण्यात येणार आहे.
कालाष्टमी पूजेत मातीचे मडके, वेणी, फणी, पिठापासून तयार केलेले आणि तळलेले तारे आणि सूर्य या वस्तूंचा पूजेसाठी वापर केला जातो.
मडक्यात आठवी मातेची प्रतिमा, बोरे, आवळा, शिंगाडा आणि तळलेले पदार्थ ठेवून परंपरेनुसार पूजा केली जाते.
आठवी पूजनाच्या दिवशी आंबील या पदार्थला विशेष महत्व आहे.
आठवी मातेला आंबीलाचा नैवेद्य दाखवला जातो.
या दिवशी महिला आंबील खाऊन उपवास सोडतात.
यानंतर आरती करून घरातील मंडळी दर्शन घेतात.