Surabhi Jayashree Jagdish
टायरमध्ये कंपनीने सांगितलेल्या प्रमाणात हवा ठेवावी. हवा कमी असल्यास बाईक चालवताना रस्त्याशी टायरचं घर्षण वाढतं. त्यामुळे इंजिनवर जास्त प्रेशर पडू शकतं आणि पेट्रोलचा वापर वाढू शकतो.
बाईकची सर्व्हिसिंग वेळेवर केल्याने इंजिन आणि इतर भाग योग्य स्थितीत राहतात. इंजिन ऑइल, एअर फिल्टर आणि स्पार्क प्लग यांचीही वेळेवर तपासणी करावी. बाईक व्यवस्थित ठेवली तर इंजिनची कार्यक्षमता चांगली राहण्यास मदत होते.
बाईकचा वेग आणि रस्त्याची परिस्थिती पाहून योग्य गिअर वापरावा. खूप कमी गिअरमध्ये जास्त वेगाने बाईक चालवल्यास इंजिनवर अनावश्यक ताण येतो. तसंच खूप जास्त गिअरमध्ये कमी वेगाने बाईक चालवणही टाळावं.
गरज नसताना अचानक ब्रेक लावल्यास बाईकचा वेग लगेच कमी होतो. त्यानंतर पुन्हा वेग वाढवताना इंजिनला अधिक ऊर्जा लागते. त्यामुळे पुढील वाहतुकीचा अंदाज घेऊन हळूहळू वेग कमी क
सतत अॅक्सिलरेटर वाढवून बाईकचा वेग बदलत राहिल्यास पेट्रोलचा वापर वाढू शकतो. शक्य असेल तेव्हा बाईक स्थिर वेगात चालवावी. यामुळे अनावश्यक अॅक्सिलरेशन कमी होतं.
सिग्नलवर किंवा जास्त वेळ थांबावं लागणार असल्यास बाईक विनाकारण सुरू ठेवू नये. इंजिन सुरू असताना बाईक चालत नसली तरी पेट्रोलचा वापर होत राहतो. मात्र कमी वेळ थांबायचं असल्यास वारंवार इंजिन बंद-चालू करण्याऐवजी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा.
40 ते 50 किमी प्रतितास या मध्यम वेगात बाईक चालवल्यास इंधनाची कार्यक्षमता चांगली राहू शकते. मात्र योग्य स्पीड हा बाईकचे मॉडेल, इंजिन, गिअर आणि रस्त्याची परिस्थिती यावरही अवलंबून असतो.