साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री रिद्धी डोगरा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
या वेबसिरीजमधील दमदार अभिनयासाठी ती ओळखली जाते.
अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये एक आरसा आहे, ज्यावर लाल लिपस्टिकने करण असभ्य, असं लिहिलं आहे.
आत यावर लोक विचारू लागले की, रिद्धी करण नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे का?
तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, माझं हृदय तुटण्याचं कारण करण आहे.
रिद्धी ज्या करणबद्दल बोलत आहे तो अभिनेता करण ग्रोवर असून तो विवाहित आहे.
दरम्यान, रिद्धीने ही पोस्ट एका प्रोजेक्टसाठी शेअर केली आहे. ज्यामध्ये दोघे एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत.
रिद्धीने 2011 मध्ये राकेश बापटशी लग्न केले होते, परंतु 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.