Ashadhi Ekadashi 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक केली विठूरायाची महापूजा, पाहा फोटो

Priya More

विठूरायाची महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक विठूरायाची पूजा केली.

Cm Eknath Shinde | Social Media

सपत्नीक महापूजा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापुजा संपन्न झाली.

Cm Eknath Shinde With Wife | Social Media

मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय उपस्थित

या महापूजेला मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश हे देखील उपस्थित होते.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

शेतकरी दाम्पत्यांना पूजेचा मान

यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातल्या वाकडीचे भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल काळे या शेतकरी दाम्पत्यांना पुजेचा मान मिळाला.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

शासकीय पूजा

भाऊसाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजा केली.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

25 वर्षांपासून पायी वारी

हे पती-पत्नी गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराज यांच्यासोबत देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी करतात.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

समाधानकारक पाऊस

राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे, अशी मुख्यमंत्र्यांनी विठुराया चरणी प्रार्थना केली.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

बळीराजा सुखा राहावा

तसंच, राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

जनसेवेचा वसा

जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन त्याच्याकडे व्यक्त केली, असे त्यांनी सांगितले.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

भाग्य मिळाले

आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रखुमाईची विधीवत महापूजा करण्याचे भाग्य मला मिळाले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

मनोहर रूप

सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्याची मनोभावे आराधना करण्याची संधी मला मिळाली, असे ते म्हणाले.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

फोटो व्हायरल

महापूजा करतानाचे मुख्यमंत्र्यांचे कुटुंबासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ashadhi Ekadashi 2023 | Social Media

NEXT: Reason Fish Earrings Of Vitthal: विठ्ठलाच्या कर्णकुंडलात मासे का असतात?

Ashadhi Ekadashi | saam tv
येथे क्लिक करा...