Skin care: थंडीमध्ये हाताचं कोपर काळं पडतंय? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

Surabhi Jayashree Jagdish

कोपर काळं पडणं

हिवाळ्यात हाताच्या कोपराचा भाग कोरडा, खरखरीत आणि काळसर दिसू लागतो कारण या भागात तेलकटपणा कमी असतो आणि घर्षण जास्त होते. थंड हवेमुळे त्वचेतील ओलावा झपाट्याने कमी होतो आणि मृत त्वचा जाड थर तयार करते.

योग्य काळजी

योग्य काळजी, मॉइश्चरायझिंग आणि घरच्या सोप्या उपायांनी हा काळेपणा हळूहळू कमी करता येतो. खाली दिलेल्या टिप्स नियमित केल्या तर कोपराचा रंग, मऊपणा आणि टेक्स्चर यात स्पष्ट बदल जाणवू लागतात.

लिंबाचा सौम्य स्क्रब वापरा

लिंबात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात जे काळसरपणा कमी करतात. त्यात थोडी साखर मिसळून स्क्रब केल्याने डेड स्किन निघून जाते.

बेसन आणि दुधाचा पॅक लावा

बेसन त्वचा एक्सफोलिएट करतं आणि दुधातील लॅक्टिक अॅसिड उजळपणा वाढवतं. हा पॅक घट्ट थराने कोपरावर लावून १५ मिनिटांनी धुणे फायदेशीर. नियमित वापराने कोपराचा रंग सम होतो.

नारळाच्या तेलाने मसाज करा

नारळाचं तेल त्वचेला पोषण देतं आणि त्वचा मऊ करते. कोपरावर रोज ५ मिनिटे मसाज केल्यास कोरडेपणा कमी होतो. काळसरपणा कमी करण्यातही हे तेल मदत करतं.

अॅलोव्हेरा जेलचा वापर करा

अॅलोव्हेरा त्वचेला शांत करून हायड्रेशन वाढवतो. रात्री झोपण्यापूर्वी कोपरावर लावून ठेवले तर त्वचा हळूहळू उजळते. हा उपाय संवेदनशील त्वचेसाठीही सुरक्षित आहे.

साखर-ऑलिव्ह ऑईल स्क्रब

साखर डेड स्किन काढतं आणि ऑलिव्ह ऑईल त्वचेला पोषण देतं. आठवड्यातून दोनदा स्क्रब केल्यास कोपराचा काळेपणा हटतो. त्वचा अधिक मऊ वाटू लागते.

दूध आणि हळदीचा लेप

दुधातील अॅसिड्स आणि हळदीचे अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचा उजळ आणि स्वच्छ करतात. हा लेप १०–१२ मिनिटांनी धुवून काढा. त्वचा निरोगी दिसण्यास मदत होते.

रोज मॉइश्चरायझर वापरा

हिवाळ्यात मॉइश्चरायझर न लावल्यास कोपर अधिक राठ होतात. आंघोळीनंतर लगेच कोपरावर जाड थराने लावा. नियमित वापर त्वचा मऊ ठेवतो आणि काळसरपणाही कमी होतो.

Borivali Tourism: थंडीच्या दिवसात बाहेर भटकायला जायचंय? लांब न जाता बोरिवलीच्या या ठिकाणी फिरून या

येथे क्लिक करा