Dhanshri Shintre
उन्हाळ्यात जड नाश्ता टाळा, कारण तो पचायला अवघड असतो. त्याऐवजी हे ७ हलके, आरोग्यदायी पर्याय तुम्हाला ताजेतवाने ठेवतील.
उन्हाळ्यात पचायला सोपा आणि झटपट तयार होणारा पोहा, कांदा-शेंगदाणा भरपूर आणि लिंबाच्या चवेसह हलका नाश्ता ठरतो.
थंडगार दह्यात आवडती हंगामी फळं मिसळा, त्यात मध, चिया बिया घालून तयार करा ताजेतवाना, चविष्ट आणि पोषक नाश्ता.
ऑम्लेटमध्ये केळ व अॅव्होकॅडो घालून तयार करा फायबरयुक्त, हेल्दी नाश्ता; तो ऊर्जा देतो आणि उन्हाळ्यात आळस दूर ठेवतो.
रव्यापासून तयार केलेले उपमा हलके व पचायला सोपे असते; त्यात भाज्या व थोडे तूप घालून करा पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता.
ओट्स दूध, फळं व काजूंसह तयार करा; गरम किंवा थंड खाता येणारा हा नाश्ता हृदयासाठी चांगला व पोटभर ठेवणारा आहे.
मूग डाळीपासून तयार केलेले पॅनकेक्स प्रथिनांनी भरलेले, हलके आणि पचायला सोपे; पुदिन्याची चटणी किंवा थंड दह्यासोबत चविष्ट लागतात.
संपूर्ण धान्याच्या टोस्टवर स्क्रॅम्बल्ड अंडी हा सोपा, जलद आणि पोषक नाश्ता आहे जो ऊर्जा देतो आणि दिवसाची उत्तम सुरुवात करतो.