साम टिव्ही ब्युरो
जगात असे कोण असेल ज्याला आपल्या वयापेक्षा तरुण दिसावेसे वाटणार नसेल. परंतु म्हातारपण येणं ही एक निश्चित प्रक्रिया आहे, जी थांबवता येत नाही.
जसजसे वय वाढते तसतसे त्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. पण जर तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेतली तर तुम्ही वृद्धत्वाची लक्षणे कमी करू शकता आणि तुमच्या वयापेक्षा 10 वर्षे लहान दिसू शकता.
भरपूर पाणी, निरोगी जीवनशैली, पुरेशी झोप आणि नियमित व्यायामाने तुम्ही वृद्धत्वाची लक्षणे टाळू शकता.
त्वचा तरुण ठेवण्यासाठी अॅव्होकॅडोचे सेवन करा. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेडसह अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जे त्वचेला तरुण ठेवण्यासाठी प्रभावी असतात.
याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई आणि के देखील असते. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
ब्रोकोलीमध्ये Anti-Aging आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के देखील आहेत. ज्यात सुरकुत्या विरोधी अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.
ब्रोकोली शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवते. जास्तीत जास्त पोषण मिळवण्यासाठी ब्रोकोली कच्ची किंवा स्टीम करून खाणे फायदेशीर आहे.
त्वचा तरूण आणि सुंदर ठेवण्यासाठी, दररोज व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचे सेवन केले पाहिजे. संत्री, द्राक्षे, किवी, अननस, स्ट्रॉबेरी इत्यादी सर्व व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत आहेत.