Anjeer Benefits: रात्रभर पाण्यात भिजवलेले अंजीर सकाळी उठल्यावर खल्याने होतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Shruti Vilas Kadam

पचनक्रिया सुधारण्यास मदत

अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सकाळी भिजवलेले अंजीर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.

Anjeer | Pintrest

शरीराला ऊर्जा मिळते

अंजीरमध्ये नैसर्गिक साखर आणि पोषक घटक असतात. त्यामुळे सकाळी अंजीर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.

Anjeer Benefits | Yandex

हाडे मजबूत ठेवण्यास सहाय्यक

अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक आढळतात. हे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

Anjeer Benefits | Canva

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत

फायबरयुक्त असल्यामुळे अंजीर खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वारंवार भूक लागणे कमी होण्यास मदत मिळू शकते.

Anjeer Benefits | Canva

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

अंजीरमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.

Anjeer Benefits | Yandex

त्वचेसाठीही उपयुक्त

अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. नियमित सेवन केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू शकते.

Anjeer Benefits

अंजीर कसे खावे?

रात्री २ ते ३ अंजीर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. भिजवलेले अंजीर पचायला तुलनेने सोपे मानले जातात.

Anjeer Benefits | Canva

Face Care: महागड्या फेशियलची काय गरज? घरच्या घरीच 'हा' फेसमास्क लावून मिळवा गुलाबी मुलायम त्वचा

Face Care | Saam tv
येथे क्लिक करा