Ruchika Jadhav
जेवण बनवताना अनेकदा भाजीमध्ये तेल जास्त पडतं.
जास्त तेल असल्यास असं जेवण खाणे अनेक व्यक्ती शक्यतो टाळतात.
कारण जास्त तेलकट जेवणाचा थेट आपल्या हृदयावर दुष्परीणाम होतो.
जास्त प्रमाणात तेल असलेले पदार्थ खाल्ल्याने पोट देखील खराब होते.
तसेच वजन वाढते. शरिरातील कोलेस्ट्रॉलही वाढते तेलकट जेवण खाल्ल्याने वाढतं.
आता भाजी जास्त ऑइली असेल तर त्यातील तेल कमी करण्यासाठी तुम्ही चमच्याचा वापर करू शकता.
तेल जास्त झाल्यास त्या भाजीमध्ये बेसण पीठ भाजून मिक्स करावे. त्याने जेवताना जास्त तेल लागत नाही.
सर्वात सोप्पा उपाय म्हणजे बर्फाच्या सहाय्याने देखील तुम्ही भाजीमधील अतिरिक्त तेल काढू शकता.