साम टिव्ही ब्युरो
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रीलीज झालं आहे.
अमृता फडणवीस या बँकर असून, त्या गायिकाही आहेत. त्यांना गायनाची प्रचंड आवड आहे.
आता त्यांचं नवं गाणं प्रदर्शित झाले आहे. ‘आज मैं मूड बणा ले या...’ असे या गाण्याचे बोल आहेत.
Mood Banaleya असे या गाण्याचे बोल असून, सध्या ते सोशल मीडियावर तुफान हिट झालं आहे.
अवघ्या काही तासांत या व्हिडिओ साँगला जवळपास पावणेतीन लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अमृता फडणवीसांचा लूक आणि त्यांनी केलेले नृत्य यामुळे या प्रेक्षकांचा वाढता कल दिसतो आहे.