Shruti Vilas Kadam
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे शरीराची इम्युनिटी मजबूत करते आणि सर्दी-खोकला, संसर्ग यापासून संरक्षण देते.
आवळा पचनसंस्था मजबूत करतो. बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅसच्या तक्रारी कमी करण्यास मदत होते.
आवळा केसगळती कमी करतो, केस मजबूत करतो आणि अकाली पांढरे होणे रोखण्यास मदत करतो. केसांना नैसर्गिक चमक मिळते.
आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात. सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा उजळ व तजेलदार दिसते.
आवळा शरीरात आयर्नचे शोषण वाढवतो. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा कमी होतो.
आवळा मेटाबॉलिझम वाढवतो आणि चरबी कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो.
आवळा डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतो. डोळ्यांची जळजळ, थकवा आणि कमजोरी कमी होते.