Manasvi Choudhary
सप्टेंबर ते नोव्हेंबर दसरा, दिवाळी सणासुदीच्या या महिन्यात खरेदी करण्याकडे कल वाढलेला असतो.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर लवकरच सेल सुरू होत आहे.
महत्वाचे म्हणजे हे दोन्ही सेल्स एकाच दिवशी 8 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होत आहे.
अमेझॉनवर 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' आणि फ्लिपकार्टवर 'बिग बिलियन डेज'या नावाने हे सेल तुम्ही पाहू शकाल.
अमेझॉनवर SBI बँकेच्या कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तर फ्लिपकार्टवर ICICI, Axis आणि Kotak या बँकांच्या कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट असेल
अमेझॉन सेलमध्ये जवळपास सर्वच कॅटेगरीमध्ये मोठा डिस्काउंट असेल.
अॅलन सोली, व्हॅन ह्युसेन आणि यूएसपीए अशा टॉपच्या ब्रँड्सवर 84 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट असणार आहे. तर हार्पा, बिबा, मिस चेस अशा ब्रँड्सवर 86 टक्क्यांपर्यतची सूट असेल.
फ्लिपकार्टच्या यूजर्सना देखील सर्वच कॅटेगरीमध्ये बंपर डिस्काउंट मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, वुमेन्स वेअर एकूणच या सर्व कॅटेगरींमध्ये 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.
मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये देखील मोठे डिस्काउंट्स देण्यात आले आहेत. एक लाख रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोन्सवर एक्सचेंज ऑफर्स देखील असेल.