Manasvi Choudhary
कोणताही पदार्थ रूचकर आणि स्वादिष्ट बनवायचा असेल तर आहारात हिरवी मिरची वापरली जाते.
निरोगी आरोग्यासाठी हिरवी मिरची खाण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.
हिरव्या मिरचीमध्ये कॉपर, प्रोटीन, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट यासांरखे पोषक तत्वे आहेत.
हिरवी मिरची खाल्याने कोलेस्टॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते हृदयरोग असणाऱ्यांना हिरवी मिरची खाण्याचा सल्ला दिला जातो.
मधुमेह असलेल्या रूग्णांनी नियमितपणे हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
हिरव्या मिरचीच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. हिरव्या मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे कर्करोगाच्या पेशी वाढवणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून शरीराचं संरक्षण करते