Amarnath Yatra Shivling Photos: अमरनाथ यात्रा सुरु होण्यापूर्वी शिवलिंगाचे फोटो आले समोर

Priya More

शिवलिंगाचे फोटो

अमरनाथ यात्रा येत्या 1 जुलैपासून सुरु होणार आहे. यात्रा सुरु होण्यापूर्वीच शिवलिंगाचे फोटो समोर आले आहेत.

पहिली झलक

अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानी यांची पहिली झलक समोर आली आहे.

शिवलिंग तयार

अमरनाथ गुहेतील नैसर्गिक शिवलिंग पूर्णपणे तयार झाल्याचे दिसत आहे.

पार्वती आणि गणेश यांचे प्रतीक

पवित्र शिवलिंगासोबत माता पार्वती आणि गणेश यांचे प्रतीक असलेला हिमस्तंभ देखील तयार झाला आहे.

तयारी सुरु

अमरनाथ यात्रा सुरु व्हायला एक महिना शिल्लक आहे. या यात्रेनिमित्त जोरदार तयारी सुरु आहे.

रस्त्याचे काम सुरु

अमरनाथ यात्रेचा मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. यावेळी यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे.

सुरक्षेची पाहणी

सुरक्षा दलाचे अधिकारी आणि जवान यांनी अमरनाथ गुहेत जाऊन सुरक्षेच्या व्यवस्थेची पाहणी केली.

यावर्षी जास्त बर्फवृष्टी

यावर्षी मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे यात्रा मार्गावर बर्फ साचला आहे. ते हटवण्याचे काम सुरु आहे.

NEXT: Toothpaste Colour Code: 'टूथपेस्ट'वर या 4 रंगांची चिन्ह का असतात?

Color Symbols On Toothpaste | social media
येथे क्लिक करा...