Shruti Vilas Kadam
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक एकटेच जेवतात. ऑफिसमधील दुपारच्या जेवणाची सुट्टी असो किंवा घरातील रात्रीच्या जेवणाची वेळ असो, बरेच लोक आपल्या फोन किंवा लॅपटॉपसमोर एकटेच जेवतात.
ही सवय सुरुवातीला क्षुल्लक वाटू शकते, परंतु तज्ज्ञांच्या मते, सातत्याने एकटे जेवण्याचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
घरातून काम करणे, व्यस्त वेळापत्रक आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यांमुळे लोक कुटुंब आणि मित्रांसोबत जेवण करण्यापासून विचलित होत आहेत.
बरेच लोक घाईघाईने जेवण उरकतात, तर काही जण एकटेपणामुळे एकटेच जेवणे पसंत करतात. ही सवय हळूहळू इतकी सामान्य झाली आहे की लोकांच्या तिच्या परिणामाकडे लक्षही जात नाही.
तज्ञांच्या मते, एकत्र जेवण केल्याने केवळ पोटच भरत नाही, तर भावनिक बंधही निर्माण होतात. जेव्हा आपण कुटुंब किंवा मित्रांसोबत जेवतो, तेव्हा आपण गप्पा मारतो, हसतो.
दिवसाच्या तणावातून थोडा विसावा घेतो. मात्र एकट्याने जेवताना ही संधी मिळत नाही. ज्यामुळे हळूहळू एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते.
एकटे जेवल्याने व्यक्तीला इतरांपासून वेगळे पडल्यासारखे वाटू शकते. यामुळे तणाव आणि चिंतेचा धोका वाढतो. काही अभ्यासांमधून असेही दिसून आले आहे की, जे लोक वारंवार एकटे जेवतात.
त्यांच्यामध्ये उदासी आणि खिन्नता जाणवण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय, एकटे जेवताना फोन पाहण्याची किंवा टीव्ही बघण्याची सवय सजगतेने जेवण्याच्या पद्धतीत व्यत्यय आणू शकते.