Dhanshri Shintre
एअरटेलकडे ग्राहकांसाठी किफायतशीर ते प्रीमियम अशा विविध रिचार्ज प्लॅनची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे.
कंपनी आपल्या ग्राहकांसाठी संपूर्ण वर्षभर सुविधा देणारा, ३६५ दिवसांचा सर्वात फायदेशीर आणि दमदार प्लॅन ऑफर करते.
या प्लॅनअंतर्गत यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा सुविधा आणि जिओहॉटस्टारचे वार्षिक मोफत सबस्क्रिप्शन एकत्रितपणे उपलब्ध होते.
एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनद्वारे ग्राहकांना देशभरात अमर्यादित मोफत कॉलिंगसह राष्ट्रीय रोमिंगची विशेष सुविधा दिली जाते.
या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन २.५ जीबी हाय स्पीड डेटा आणि १०० मोफत एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे.
५जी स्मार्टफोन असलेल्या ग्राहकांना या प्लॅनसोबत हाय स्पीडसह अमर्यादित ५जी डेटाचा विशेष फायदा घेता येणार आहे.
तसेच, या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना Perplexity AI चे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत दिले जाईल, असा लाभ मिळणार आहे.
या प्लॅनसोबत ग्राहकांना वर्षभरासाठी एअरटेल एक्सस्ट्रीम तसेच जिओहॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून दिले जाते.
एअरटेलकडून ऑफर करण्यात आलेल्या या आकर्षक प्लॅनची किंमत ३,९९९ रुपये असून ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात.