Air Pollution: वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलेली ही काळजी नक्की घ्या!

Shruti Vilas Kadam

घराबाहेर पडताना मास्क वापरा

बाहेर जाताना N95 मास्क लावा. यामुळे हवेत असलेली धूळ आणि प्रदूषणाचे बारीक कण श्वासावाटे शरीरात जाण्यापासून कमी होण्यास मदत होते.

Air Pollution | Google

प्रदूषण जास्त असताना खिडक्या बंद ठेवा

सकाळी ७ ते ११ या वेळेत प्रदूषण जास्त असल्यास घराच्या खिडक्या बंद ठेवा. बाहेरची हवा जास्त प्रदूषित असेल तर घरात येऊ देऊ नका.

Pollution | GOOGLE

एअर प्युरिफायर वापरा

घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी HEPA फिल्टर असलेले एअर प्युरिफायर वापरा. यामुळे हवेतील धुळीचे आणि प्रदूषणाचे कण कमी होण्यास मदत होते.

Air Pollution | Social Media

लहान मुले आणि ज्येष्ठांची काळजी घ्या

पाच वर्षांखालील मुले, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांनी प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करावा. शक्यतो जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.

Pollution | yandex

तेलकट आणि गोड पदार्थ कमी खा

तेलकट, जास्त खारट आणि गोड पदार्थ खाणे कमी करा. आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

Oily Food | GOOGLE

दिवसभर भरपूर पाणी प्या

शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. दिवसभर पुरेसे पाणी प्या. कोमट पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळू शकतो.

drink water | pinterest

सर्दी-खोकला वाढल्यास डॉक्टरांकडे जा

सतत सर्दी, खोकला किंवा घशात खवखव होत असेल तर दुर्लक्ष करू नका. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

dry cough remedies | pinterest

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

dry cough remedies | pinterest

Blouse Desing For Festival Saree: सण-समारंभात उठून दिसायचंय? हेवी साडीसाठी निवडा ब्लाउजचे ७ ट्रेंडी सुंदर डिझाइन्स

Blouse Desing For Festival Saree | Saam Tv
येथे क्लिक करा