Manasvi Choudhary
दिवाळी तुलसी विवाहनंतर लग्नाचा मुहूर्त शुभ मानला जातो. नोव्हेंबरपासून लग्नसोहळ्यास सुरूवात होईल. या वर्षी अनेक शुभ मुहूर्त आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी विवाहसाठी नोव्हेंबर २०२५ ते जुलै २०२६ पर्यंत ४९ दिवस शुभमुहूर्त आहेत. यामुळे दिवाळीनंतर लग्नाचा बॅण्ड वाजणार असल्याचं दिसणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात २२, २३, २५, २६, २७, ३० हे लग्नाचे शुभमुहूर्त आहेत. तर डिसेंबरमध्ये २ आणि ५ या तारखेला लग्नाचे शुभमुहूर्त आहेत.
फेब्रुवारी लग्नाचे शुभमुहूर्त अधिक आहेत. या महिन्याच्या ६, ७, १०, ११, १२, २०, २१, २२,२५, २६ या तारखा आहेत.
मार्च महिन्यात ५,७, ८, १४,१५, १६ तर एप्रिल महिन्यात २१, २६, २८, २९, ३० या तारीख आहेत.
मे महिन्यात १, ३, ६, ८, ९, १०, १३, १४ तर जूनमध्ये १९, २३, २४, २७ आणि जुलैमध्ये १, ३, ४, ७, ८, ११ या शुभ तारखा आहेत.
गुरूचा अस्त आणि शुक्रचा अस्त यामुळे यावर्षी ग्रहसंयोग विवाहयोगासाठी फारसे अनुकूल नाहीत.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.