ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोणतेही प्रेमळ नाते तुटने नेहमी दु:खाचे असते. रिलेशनशीपमध्ये असलेल्या दोन्ही व्यक्तींना या गोष्टींचा खोलवर प्रभाव पडतो.
ब्रेकअपनंतर दोघांमध्येही लगेच बदल होत नाही, परंतु मुली काही गोष्टी करतात.
येथे मुलींनी कोणत्या गोष्टी करू नयेत हे पाहूयात. तुम्हीही असे करत असाल तर सावधान.
ब्रेकअपनंतर मुली सोशल मीडियावर फॉलोवर्सना दाखवण्यासाठी अपडेट करतात की त्या एकदम बऱ्या आहेत. परंतू असे नसते त्यामुळे तो वेळ स्वत:ला द्या
ब्रेकअपनंतर Ex च्या आयुष्यात काय चालले आहे हे बघण्यासाठी हेरगिरी करतात, असे न करता त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा.
मुलींना Ex च्या आठवणी असलेल्या गप्पा-गोष्टी आणि फोटो पाहायची सवय असते असे करणे टाळा.
ब्रेकअपनंतर सॅड सॉंग ऐकून भूतकाळ आठवू नये, तर चांगला मुड ठेवण्यासाठी हॅपी सॉंग ऐका.
मुली त्यांच्या मैत्रिणींसोबत Ex बद्दल वाईट-साईट बोलतात.
बहूतेक मुली ब्रेकअपनंतर शॉपिंग आणि मेकओव्हर करतात आणि खूप पैसा खर्च करतात.
मुली ब्रेकअपनंतर नवीन बॉयफ्रेंडच्या शोधात जातात नाहीतर लग्नाचा विचार करतात. असे न करता स्वत:ला वेळ द्या.