ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू कालगणनेनुसार, १८ जुलै ते १६ ऑगस्ट २०२३ हा ‘अधिक श्रावण’ महिना आहे.
दर दोन, अडीच वर्षांनी अधिक महिना येत असतो. यंदा हा अधिकमास श्रावण महिन्याला आधी आला आहे.
अधिक महिना हा देखील श्रावणाप्रमाणे अत्यंत पवित्र महिना मानला जातो. यामुळेच या महिन्यात काही नियम पाळणे आवश्यक असते.
अधिक महिन्यात श्रीविष्णू सहस्त्रनाम, गीता पाठ, अधिकाधिक नाम जप संकीर्तन, तुलसी समर्पण करावे ज्यामुळे सकारात्मक उर्जा मिळते
अधिक महिन्यात आपापली नित्य उपासना दृढ करणे, दररोज अन्नदान करणे, सद्ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन, श्रवण करणे अपेक्षित आहे.
अधिक महिन्यात नवे उपक्रम, विवाह, गृह प्रवेश, वास्तू खरेदी, कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या नवीन वस्तु खरेदी करू नका.
या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले असेल.
नवीन ठिकाणी देव दर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातून देवाची किंवा देवघरातील देवांची पूजा करावी
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. आम्ही अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या