Priya More
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
तेजस्वी प्रकाश एक प्रतिभावान अभिनेत्री नाही तर फॅशन आयकॉन देखील आहे.
तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटोशूट शेअर करून चाहत्यांना वेड लावण्याची एकही संधी सोडत नाही.
नुकताच तेजस्वीने लाईट पर्पल कलरच्या हाय स्लिट मिडी ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
तेजस्वीने या आउटफिटवर मेकअप केला नाही. मेकअपशिवायही ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील चमक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
तेजस्वीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.
या फोटोशूटमध्ये तेजस्वीने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
तेजस्वीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या तेजस्वी 'नागिन 6' या मालिकेत काम करत आहे.