ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे.
आई- वडीलांंच्या पाऊलावर पाऊल टाकत मुलगी श्रिया पिळगावकरनेही सिने जगतात अनोखी छाप पाडली आहे.
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत श्रियाने काम केले आहे. तिचा अभिनय आवडला आहे.
‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे श्रिया पिळगावकरने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
सध्या श्रियाच्या लेटेस्ट फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
निळ्या लूकमधील तिच्या या हटके स्टाईलवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.