Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
येत्या ९ फेब्रुवारीला सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत असलेली 'भक्षक' चित्रपट रिलीज होणार आहे.
नुकतंच सई ताम्हणकरने 'भक्षक' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला खास आऊटफिट वेअर करत उपस्थिती लावली आहे.
सईने डेनिम कलरचं शॉर्ट वनपिस वेअर करत तिने जबरदस्त फोटोशूट केलंय
सई कायमच आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा खूप प्रयत्न करते. त्या फॅशनमुळे ती अनेकदा ट्रोल सुद्धा होते.
सईने हे हटके फोटोशूट एका जुन्या घराच्या बाहेर केलेलं आहे.
यावेळी सईने ग्लॉसी मेकअप करीत स्मोकी आय शॅडो लावत तिने खूप सुंदर फोटोशूट केलंय.
ओपन हेयर ठेवत आणि कॅमेऱ्यासमोर कातील अदा देत तिने सर्वांचेच लक्ष स्वत: कडे वेधले.
अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर अवघ्या काही तासांतच हजारो लाईक्स मिळाले असून एका चाहत्याने "लाजवाब सौंदर्य आणि घायाळ करणाऱ्या अदा" म्हणत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.