Chetan Bodke
अभिनेत्री रकुल प्रीत आणि अभिनेता जॅकीने २१ फेब्रुवारीला गोव्यात लग्नगाठ बांधली.
दक्षिण गोव्यातील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये या बॉलिवूडच्या क्यूट कपलने सप्तपदी घेतली.
नुकतंच हे कपल लग्नानंतर पहिल्यांदाच विमानतळावर एकत्र स्पॉट झाले आहे.
कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी रकुल यावेळी एका सुसंस्कृत सुनेप्रमाणे दिसली होती.
रकुल प्रीतने पिवळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता.
तर जॅकीने क्रीम कलरचा लखनवी स्टाईलचा कुर्ता वेअर केला आहे.
रकुलने यावेळी गळ्यात मंगळसुत्र आणि भांगेत सिंधुर लावत अगदी संस्कारी बहुप्रमाणे स्पॉट झाली.
रकुल प्रीत आणि जॅकीच्या लग्नाला अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.