साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री प्रणाली भालेरावने टकाटक सिनेमातून कमी वेळेत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
प्रणालीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली.
मॉडलिंग सोबतच प्रणालीने 2017 ची ‘फेमिना स्टायलिश डिवा’ या स्पर्धेतही सहभाग घेतला होता.
टकाटक हा प्रणालीचा पहिलाच मराठी चित्रपट होता.
टकाटक चित्रपटाने हिंदीसह अनेक चित्रपटांना टक्कर दिली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 15 कोटींची कमाई केली.
चित्रपटातील बोल्ड सीनमुळे प्रणाली टकाटक गर्ल म्हणूनही ओळखू लागली होती.
प्रणालीचा पहिलाच मराठी चित्रपट हिट ठरल्यानंतर तिला हिंदी तेलगू यासारख्या चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
प्रणालीने तेलुगु चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे.