ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताने काही खास फोटो शेअर केले आहेत.
नुकतच प्राजक्ता कर्जत येथील तिच्या फार्महाउसला गेली आहे तिने परिवारासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्राजक्ता परिवारासोबत मजा मस्ती करताना आनंदात दिसते आहे.
निसर्ग तुम्हाला आनंदित करतो. पण कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद हीच बेस्ट थेरपी आहे. असं प्राजक्ताचं म्हणणं आहे तिने कॅप्शन दिलं आहे
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.