Shivani Tichkule
एकता कपूरची प्रसिद्ध टीव्ही मालिका 'कसम से' मधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्राची देसाई ही बॉलिवूडच्या अशा सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
प्राची देसाईचा जन्म 12 सप्टेंबर 1988 रोजी गुजरातमध्ये झाला.
सुरतमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राची पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली.
प्राचीला सुरुवातीपासूनच अभिनयाची गोडी होती.
वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी प्राचीला एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.
या मालिकेत प्राची तिच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठा असलेल्या राम कपूरसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती.
2008मध्ये फरहान अख्तरसोबत 'रॉक ऑन' या चित्रपटाची ऑफर मिळाली.
‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘जिला गाझियाबाद’, ‘एक व्हिलन’, ‘लाईफ पार्टनर’, ‘बोल-बच्चन’, ‘रॉक ऑन 2’, ‘कार्बन’, ‘फॉरेन्सिक’ अश अनेक चित्रपटांमध्ये प्राची देसाई झळकली आहे.