Shruti Vilas Kadam
पूजा हेगडेने दिवाळीच्या निमित्ताने सुंदर पिंक कलरची साडी परिधान केली होती. तिच्या या पारंपरिक लुकने चाहत्यांची मने जिंकली.
पूजाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो काही क्षणांतच व्हायरल झाले. चाहत्यांनी तिच्या ग्रेसफुल आणि एलिगंट स्टाइलचे कौतुक केले.
या लुकमध्ये पूजाने मिनिमल मेकअप, न्यूड लिपशेड आणि नैसर्गिक हेअरस्टाइल ठेवली होती. तिचा हा सणासुदीचा लुक अत्यंत आकर्षक दिसत होते.
पूजा हेगडे सध्या ‘जन नायकन’ या तमिळ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा एक राजकीय थ्रिलर अॅक्शन ड्रामा आहे.
या चित्रपटात पूजाची जोडी सुपरस्टार थलपती विजय यांच्यासोबत जमणार आहे. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
या चित्रपटात बॉबी देओल सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्यांचा नेगेटिव्ह कॅरेक्टर प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.
‘जन नायकन’ हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.