Satish Daud
कियारा आडवाणीचा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये समावेश आहे.
कियारा आडवाणी कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी हटके लूकने कायमच चर्चेत असते.
नुकताच कियाराने सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
कियारा आडवाणीच्या या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कियाराने लाल रंगाचा वनपिस ड्रेस घातला आहे.
कियाराने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
कियाराने या लूकमध्ये किलर पोझ देत चाहत्यांची मने जिंकली आहेत.तिच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे.
कियारा आडवाणीने हे नवे फोटोशूट तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
कियारा आडवाणीने २०१४ साली ‘फुगली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.