Chetan Bodke
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी करीना सध्या तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आली आहे.
अलीकडेच, दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ कार्यक्रमात करीनाने स्टायलिश गोल्डन लेहेंगा परिधान करीत हटक्या अंदाजामध्ये हजेरी लावली होती.
ग्लॉसी मेकअप करत, स्मोकी आय लायनर लावत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
गोल्डन रंगातील लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोजेस दिल्या आहेत.
जरीही सिने जगतात करीना फारशी सक्रिय दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते.
करीना इन्स्टाग्रामवर कायमच नवनवे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.