Chandrakant Jagtap
जॅकलीन फर्नांडिसची फॅशन निवड प्रत्येक वेळी चाहत्यांना प्रभावित करते. जॅकलिन दररोज तिचे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
जॅकलीनने बहुरंगी ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा लूक खूपच आकर्षक आणि मादक दिसत आहे.
जॅकलीनने परिधान केलेल्या विविधरंगी ड्रेस लुकवरून नजर हटवणे कठीण आहे. जॅकलिन फर्नांडिसने चांदण्यांनी जडलेला एक अतिशय सुंदर गाऊन परिधान केला आहे.
या गाऊनसोबत जॅकलिनने स्टिलेटोस फूटवेअर घातले. अॅक्सेसरीजमध्ये तिने खूपच सुंदर ईअररिंग आणि रिंग्ज घातल्या आहेत.
हा थाय हाय स्लिट गाऊन जॅकलिनने ज्या पद्धतीने हा गाऊन परिधान केला त्यामुळे ती खूपच स्टायलिश दिसतेय.
या लूकसाठी तिने केसांना शॉर्ट हेअरस्टाइल केली, या प्रकारची केशरचना उन्हाळ्यासाठी योग्य आहे.
या लूकसाठी तिने ग्लॉसी मेकअप केला, ब्राऊन लिपशेडमुळे ती खूपच मादक दिसतेय.
जॅकलिनचा हा लूक रात्रीच्या पार्टीसाठी परफेक्ट आहे. तुम्हीही कुठे पार्टीला जाण्याचा विचार करत असाल तर अशा प्रकारचा लूक करू शकता.