Chetan Bodke
निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदे कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.
श्वेता कायमच चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे.
कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या श्वेताने नुकतीच ‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२३’ या कार्यक्रमाला हजेरी लावली.
नुकताच श्वेताने मराठमोळ्या पद्धतीमध्ये, सुंदर दागिने आणि साजेसा मेकअप करत खास फोटोशूट केला आहे.
काळ्या रंगाची साडी, डार्क हिरव्या रंगाचा ब्लाऊज आणि त्याला साजेसा मेकअप करुन लूक पुर्ण करत चाहत्यांचे लक्ष वेधले.
यावेळी फोटोशूट करताना, मराठमोळे दागिने परिधान करुन आणि केसात गजरा माळून तिने फोटोशूट केले.
नेहमीप्रमाणेच यासुद्धा फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
श्वेता एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने मालिकेंची निर्मिती सुद्धा केली आहे. छोट्या पडद्यापासूनच अभिनयाची सुरुवात केली.
श्वेता शिंदेने लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस २ आदी मालिकांची तिने निर्मिती केली आहे.