Chetan Bodke
एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या ललितच्या अभिनयाची नेहमीच चर्चा होते.
आपल्या अभिनयाच्या माध्यमातून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या ललितचं खरं नाव तुम्हाला माहीत आहे का?
ललितने सिनेविश्वात ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेच्या माध्यमातून त्याने स्वतःची ओळख प्रस्थापित केली. त्याच्यासोबत मालिकेमध्ये प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत होती.
ललित प्रभाकर मूळचा कल्याणकर असून त्याचे बाबा प्राध्यापक तर त्याची आई शिक्षिका होती.
ललितच्या आई- वडिलांना पूर्वी पासून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करून शासकीय नोकरी करावी अशी इच्छा होती.
पण तरीही त्याने अभिनय सृष्टीत पदार्पण केले.
ललित प्रभाकरचं पूर्ण नाव ‘ललित प्रभाकर भदाणे’ असं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी युट्यूबवर प्रदर्शित झालेली ‘पेटपुराण’ या दोन्हीही वेबसीरिज मुळे तो बराच चर्चेत होता.
ललितचा शेवटचा चित्रपट ‘सनी’ हा चित्रपट ठरला आहे. त्या नंतर तो कोणत्याही चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसला नाही.