वास्तू शास्त्रानुसार 'हे' रोप लावल्याने घरी बरसतो पैसा

Surabhi Jayashree Jagdish

वनस्पती

वास्तुशास्त्रात अनेक प्रकारच्या वनस्पती सांगितल्या आहेत ज्या घरासाठी शुभ मानल्या जातात.

कोणती वनस्पती?

कोणती वनस्पती घरी लावणे खूप फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.

कण्हेरचे रोप

हिंदू धर्मात कण्हेरची वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते. त्याची सुंदर फुलं घराचं सौंदर्य तर वाढवतातच शिवाय अनेक शुभ परिणामही देतात.

संपत्ती वाढते

घरामध्ये कण्हेरचे रोप लावल्याने संपत्ती वाढते असं मानलं जातं.

सकारात्मक उर्जा

वास्तुशास्त्रानुसार कण्हेरच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.

कण्हेरचं फूल

पांढरं कण्हेरचं फूल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, त्यामुळे घरात धन-समृद्धी वाढते.

करिअरमध्येही यश

कण्हेर वनस्पती करिअरमध्येही यश मिळवून देते. या रोपाची लागवड करून व्यावसायिकांनाही फायदा होतो.