Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे फक्त महान राजकारणी आणि शिक्षक नव्हते, तर मानवी यशाची वाट दाखवणारे गुरु होते. त्यांच्या नीतीमध्ये जीवन, यश आणि संपत्ती मिळवण्याच्या काही युक्त्या दिल्या आहेत.
श्रीमंत होण्याच्या मार्गावर असलेला माणूस छोट्या गोष्टींमध्ये अडकत नाही. तो भविष्याचा विचार करतो आणि समस्यांकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतो.
भीती, शंका आणि नकारात्मकता हळूहळू आत्मविश्वासात बदलते. याने स्वतःवर आणि आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवायला मदत होते.
वेळ वाया घालवणाऱ्या सवयी, फालतू चर्चा आणि निष्फळ संगतीपासून लांब राहा. प्रत्येक दिवस उपयोगी कसा होईल याकडे त्याचे लक्ष द्या.
दिखाव्यावर खर्च करणं नेहमीच टाळा. गरज आणि इच्छा यातला फरक स्पष्टपणे समजू घ्या.
पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा याचा विचार करायला घ्या. भविष्यासाठी बचत करणं सवय बनवा.
ज्ञान, कौशल्य आणि अनुभव वाढवण्यावर भर द्या. नवीन गोष्टी शिकणं आणि चुका सुधारण्याची तयारी ठेवा.
अपयश आल्यावर तो खचून न जाता, तर त्यातून धडा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
सकारात्मक, मेहनती आणि प्रेरणादायी लोकांच्या संपर्कात राहा. नकारात्मक आणि आळशी लोकांपासून अंतर ठेवा.