Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि आयुष्यात यशाचा मार्ग दाखवणारे गुरु मानले जातात. त्यांचे विचार आजही मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात.
लोक काय म्हणतील, समाज कसा पाहील या भीतीमुळे अनेक लोक नवीन व्यवसाय, नोकरी बदल किंवा मोठे निर्णय घेणं सोडतात.
चाणक्य म्हणतात, लोकांना लाजून जास्त विचार केल्यावर व्यक्ती स्वतःची क्षमता वापरू शकत नाही आणि आयुष्यभर संधी गमावतो.
व्यापार सुरू करणे, गुंतवणूक करणे किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोखीम आवश्यक असते, पण लाजेची भीती माणसाला मागे खेचते.
मृत्यूची सतत भीती बाळगणारा माणूस आयुष्य पूर्णपणे जगू शकत नाही. तो धाडसी निर्णय घेताना खूप घाबरतो.
चाणक्य सांगतात की मृत्यू निश्चित असताना त्याच्या भीतीत जगणं म्हणजे जीवन व्यर्थ घालवणे होय.
सैनिक, व्यापारी, नेते यांनी मृत्यूचे भय आणि लाज दोन्ही त्यागली, म्हणूनच त्यांनी मोठे यश मिळवले.
लाज आणि मृत्यू भय यांचा त्याग केल्याने मन मजबूत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि यश आपोआप मिळतं.