Sakshi Sunil Jadhav
रिलेशनशिपमध्ये विश्वास सर्वात मोठं शस्त्र आहे. पार्टनरवर पूर्ण विश्वास ठेवा पण शंका कायमस्वरूपी मनातून काढून टाका.
बेस्ट फ्रेंडच्या वागण्यामुळे गैरसमज होत असेल तर ते मनात साचवून न ठेवता पार्टनरशी शांतपणे बोला.
चाणक्यांच्या मते, प्रत्येक नात्याला काही मर्यादा असतात. पार्टनर आणि बेस्ट फ्रेंडसोबतच्या रिलेशनला सुरुवातीपासूनच मर्यादा ठेवा.
राग येतोय म्हणून तडक निर्णय घेऊ नका. संयम बाळगणे हे चाणक्यांनी सांगितलेले प्रमुख तत्त्व आहे.
तुम्ही पार्टनरच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात. हे लक्षात ठेवा आणि स्वतःचं स्थान कमी समजू नका.
फ्रेंडशिप नैसर्गिक आहे, पण त्यामध्ये फ्लर्टिंगची छटा दिसली तर दुर्लक्ष न करता लक्ष ठेवा. मात्र जास्त शंका नको.
चाणक्यांच्या मते इतरांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा स्वतःला महत्वाचे बनवा. आत्मविश्वास, करिअर आणि व्यक्तिमत्त्वावर लक्ष द्या.
जर बेस्ट फ्रेंडच्या वागण्याने रिलेशनशिपमध्ये वारंवार तणाव होत असेल तर थोडे अंतर ठेवणे हाच शहाणपणाचा निर्णय आहे.