Priya More
आंबट, तुरट आणि हलकासा गोड लागणारा आवळा खायला अनेकांना आवडतो. लोणच्या पासून ते मुरांब्यापर्यंत आवल्याचे अनेक पदार्थ तयार केले जातात.
आवळ्याला 'अमृत फळ' म्हटले जाते. आवळ्यात औषधी गुणधर्म असतात. तो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.
महिनाभर आवळ्याचा ज्यूस प्यायला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. १५ दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल.
आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आवळ्याच्या ज्यूस प्यायल्याने कोणताच आजार तुमच्यापर्यंत येणार नाही. सर्व आजारांवर आवळा रामबाण उपाय आहे.
आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पोटाशी संबंधित समस्या दूर होते. पोटातील अल्सरपासून आराम मिळतो.
आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने लिव्हर आणि किडनीचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे रोज पिणे फायदेशीर राहिल.
आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने केस गळती थांबते. केस लांब, काळे आणि दाट होतात.
आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने हृदयविकाराचा धोका टळतो. हृदय निरोगी राहते.