ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘संजना’ बनून अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले घराघरांत पोहोचलेली आहे.
मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वीचा रुपालीचा प्रवास प्रचंड कठीण होता.
केवळ नववी इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या रुपालीने हिंदी टेलिव्हिजन विश्वात नाव कमावले आहे.
सोशल मीडियावर रूपाली तिचे फोटो पोस्ट करत चाहत्यांचा संपर्कात असते.