ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड जवळ असणे अत्यंत गरजेचे आहे.
आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे मानले जाणारे कागदपत्र आहे. जसे की, सरकारी योजनांचा लाभ, बॅंकेत अकाउंट ओपन करणे, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेंस इ.
अनेकदा आधार कार्डवरील नाव चुकिचे असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला uidai.gov.in च्या वेबसाईटवर जाऊन My Aadhar वाल्या सेक्शनमध्ये जा.
यात तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाका, यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल तो टाकून लॅागीन करा.
आता तुमच्या समोर Update Your Name चे ऑप्शन येईल. तुम्हाला जे नाव बदलायचे हे ते बदला.
हे अपडेट करण्यासाठी, तुम्हाला पॅन कार्डसारखे इतर ओळखपत्रे अपलोड करावी लागतील.
त्यानंतर, तुमची सर्व माहिती तपासा आणि ती सबमिट करा.