Surabhi Jayashree Jagdish
दिल्लीतील कुतुबमिनार संदर्भात तुम्ही ऐकलं असेल. याशिवाय तुम्ही तो पाहिला देखील असेल.
पण आज आम्ही तुम्हाला कुतुबमिनारजवळ असलेल्या एका झपाटलेल्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.
कुतुबमिनारजवळ एक झपाटलेली मशीद आहे.
ही काही सामान्य मशीद नाही. या मशिदीच्या आसपास असामान्य घटना घडत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
जमाल कमाली मशीद असे या मशिदीचे नाव आहे. ही मुघलकालीन इमारत आहे.
या मशिदीत जिन-जिनाद राहतात असे लोकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी रात्री कोणीतरी हसण्याचा आवाज येत असतो.
या ठिकाणी देण्यात आलेल्या गोष्टी सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची खातरजमा करत नाही