Manasvi Choudhary
मनोरंजनविश्वात गेली तीन दक्षके आपल्या अभिनयानेच नाही तर सौंदर्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षीत.
माधुरी दिक्षीत तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे.
५० ओलांडली तरी माधुरी दिक्षीतचं सौंदर्य ३० तल्या तरूणींना लाजवेल असचं आहे.
अभिनेत्री माधुरी दिक्षीतने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत जे पाहून चाहतेही तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
माधुरीने ट्रेडिशनल लूक केला आहे ज्यामध्ये तिने खास निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
माधुरीने टचअपसाठी मिनिमल मेकअप आणि मोकळे केस असा लुक केला आहे. जो खुपच उठून दिसतो आहे.
स्टायलिश पोजमध्ये माधुरीने फोटोशुट क्लिक केलं आहे. माधुरीच्या स्टाईलने सर्वांनाच वेड लावलं आहे.
सोशल मीडियावर माधुरीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.