Manasvi Choudhary
मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकल ट्रेनची ओळख आहे.
आठवडाभर मुंबईतील चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहचवणाऱ्या लोकल ट्रेनला प्रत्येक रविवारी आराम असतो.
आभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक असतो.
रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकरिता मेगाब्लॉक घेत असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगितले जाते.
रूळांची दुरूस्ती आणि यांत्रिकी कामे यासांरख्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक आहे.
रेल्वेमध्ये आणीबाणी वा अपघाती प्रसंगाशिवाय कोणतेच काम अचानक केले जात नाही यासाठी रविवारचा मेगाब्लॉक असतो.
मेगा ब्लॉकदरम्यान त्या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद असल्याने काम करण्यास कामगार निर्धास्त असतात.