ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी सारख्या बेरींमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि त्यात कॅलरीज कमी असतात.
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त, कॅलरीज कमी असते. तसेच हे हायड्रेशनसाठी उत्तम आहे.
पपईमध्ये पाचक एंझाइम पपेन भरपूर प्रमाणात असते, जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. तसेच यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.
किवीमध्ये हाय फायबर, व्हिटॅमिन ई आणि के असते. तसेच किवीमुळे पचनाची गती वाढते.
ब्रोमेलेनने समृद्ध अननस वजन कमी करण्यास मदत करते.
जांभूळ रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील चांगले आहे.